Advertisement

उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’, मनसेची योगींवर टीका

योगी आदित्यनाथ यांचा 'ठग' असा उल्लेख करून मनसेने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’, मनसेची योगींवर टीका
SHARES

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या दोन दिवसांसाठी मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. मात्र योगींच्या या दौऱ्याला केवळ महाविकास आघाडीच नव्हे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (mns) देखील विरोध होत आहे. योगी आदित्यनाथ यांचा 'ठग' असा उल्लेख करून मनसेने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

आपल्या मुंबई दौऱ्यात योगी उद्योजक आणि बाॅलिवूड निर्मात्यांची भेट घेत आहेत. नोएडात एक दर्जेदार फिल्मसिटी उभारण्याचा योगींचा प्रयत्न असून त्याबद्दल ते बाॅलिवूडमधील सेलिब्रिटींसोबत चर्चा करणार असून उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचं आवाहन उद्योजकांना करणार आहेत.  

त्यातच योगी आदित्यनाथ ज्या ठिकाणी थांबले आहेत, त्या मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलबाहेर मनसेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरवर 'कहा राजा भोज और कहा गंगू तेली... कुठं महाराष्ट्राचं वैभव तर कुठे युपीचं दारिद्र्य... असं म्हटलं आहे. तसंच, 'भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपटसृष्टी, युपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्न. अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ठग,' असं लिहून हिणवण्यात आलं आहे.

हेही वाचा- महाराष्ट्रातील उद्योजक, बाॅलिवूड निर्मात्यांना धमकावण्यासाठीच योगींचा दौर-सचिन सावंत

त्याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयकुमार बिश्त (योगी आदित्यनाथ) मुंबईत येऊन महाराष्ट्रातील उद्योजक आणि बॉलिवूड निर्मात्यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा हा कुटील डाव आहे. यासाठी उद्योजकांना धमकावण्याचा प्रयत्न देखील केला जाऊ शकतो. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती.

तर, इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना मॅग्नेटिक या शब्दात मोठी ताकद आहे. महाराष्ट्राला एक इतिहास आहे. महाराष्ट्र एक सर्वार्थाने वेगळं राज्य आहे. इथे वेगळे संस्कार आहेत. त्यामुळे इथं येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही. स्पर्धेला आम्ही घाबरत नाही. पण कुणी ओढून ताणून इथून काही घेऊन जाणार असेल, तर शक्य होणार नाही, असं वक्तव्य उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केलं.

(mns poster against up cm yogi adityanath on his mumbai visit)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा