'ऐ दिल है मुश्किल'ची मुश्किले संपली?

  Pali Hill
  'ऐ दिल है मुश्किल'ची मुश्किले संपली?
  मुंबई  -  

  मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी ठरल्यानंतर आता सिंगल स्क्रीन थिएटर सोडून 'ऐ दिल है मुश्किल' प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रोड्युसर्स असोसिएशननंही यापुढे कोणत्याही चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांना संधी देणार नसल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिलं. या बैठकीला मनसेचे प्रमुख राज ठाकरे, चित्रपटाचे दिग्दर्शक करण जोहर, प्रोड्युसर्स असोसिएशनचे मुकेश भट, सिद्धार्थ रॉय कपूर आणि इतर सदस्य उपस्थित होते. पाकिस्तानी कलाकार असल्यामुळे मनसेनं या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. जवळपास अर्धा तास ही बैठक चालली. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, शालिनी ठाकरेही या बैठकीसाठी 'वर्षा' वर उपस्थित होते.

  दरम्यान 'ऐ दिल है मुश्किल'च्या अडचणी पूर्णपणे सुटल्या नसल्याचंही चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी जरी वादावर तोडगा काढला असला, तरी सिंगल स्क्रीन थिएटर्स असोसिएशन आपल्या भूमिकेवर ठाम आहे.पाकिस्तानी कलाकार असलेला कोणताही सिनेमा प्रदर्शित करणार नसल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष नितीन दातार यांनी स्पष्ट केलंय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.