अजॉय मेहता मातोश्रीच्या दारी

 Pali Hill
अजॉय मेहता मातोश्रीच्या दारी

मुंबई - महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. मात्र याबाबतचं कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी आयुक्त अजॉय मेहता यांच्या विरोधात मुंबईतील रस्त्याच्या वाईट स्थितीवरून टीका केली होती. तसंच अविश्वासाचा ठराव मांडणार, अशी घोषणाही केली होती. त्या घोषणेला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यानुसार पुढील आठवड्यात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडला जाणार आहे. यशोधर फणसे यांनी अविश्वास ठराव मांडू नये, अशी विनंती करण्यासाठी मेहता यांनी उद्धव ठाकरे यांची ही भेट घेतली, अशी सूत्रांची माहिती आहे.

Loading Comments