Advertisement

नोटाबंदीविरोधात कॉमन पीपल्स ग्रुप रस्त्यावर


नोटाबंदीविरोधात कॉमन पीपल्स ग्रुप रस्त्यावर
SHARES

मरिन ड्राईव्ह - येथे नोटाबंदी विरोधात कॉमन पीपल्स ग्रुपने मूक निदर्शने केली. कॉमन पीपल्स ग्रुपचे अध्यक्ष विनोद चांद यांनी फेसबुकच्या माध्यमातून 70 सहकार्यांना घेऊन नोटाबंदी विरोधात साद घातली आहे. यामध्ये अनेक महाविद्यालयातील मुलेसुद्धा सहभागी झाली होती. "नोटाबंदी होऊन दीड महिना झाला. पण आजही बँकांमध्ये चलन तुटावडा होत आहे. त्यात सर्वत्र कॅशलेस ट्रांजॅक्शन होत नसल्याने व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे," असे विनोद चांद यांनी सांगितले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा