Advertisement

शरद राव यांना श्रद्धांजली


शरद राव यांना श्रद्धांजली
SHARES
Advertisement

दादर -  "शरद राव यांनी कामगारांच्या हिताचा विचार करून काम केले. कामगारांच्या हिताबाबत त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांना श्रद्धांजली वाहिली.

ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं नुकतंच दीर्घ आजाराने निधन झाले. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली  बी. एन.वैद्य सभागृहात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला प्रमुख वक्ते म्हणून सुभाष देसाई, आशिष शेलार, जयंत पाटील, विश्वास उटगी उपस्थित होते.

"शरद राव यांनी अनेक लढाया केल्या. आपल्या कष्टाचे यश आणि मोबदला कष्टक-यांना मिळावा यासाठी राव यांनी नेहमी प्रयत्न केले. मुंबई बंद करण्याची धमक त्यांच्यात होती. परंतु, सर्वव्यापी अशा विविध क्षेत्रांमध्ये लोकप्रिय असलेले यशस्वी होणारे अलीकडच्या काळातील नेते म्हणजे शरद राव. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची लोकांशी असलेली बांधिलकी," अशा शब्दांत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

संबंधित विषय
Advertisement