'कोल्ड प्ले'वरून राजकारण तापलं

कोल्ड प्ले या सुप्रसिद्ध ब्रिटिश बँडची भारतातली पहिलीच कॉन्सर्ट वादाच्या भोवर्‍यात अडकलाय. ग्लोबल सिटीझन या सामाजिक संस्थेनं ही कॉन्सर्ट वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित केलीय. त्यासाठी मैदानाच्या भाड्यात ७५ टक्के सूट देण्यात आलीये आणि करमूणक करही माफ करण्यात आलाय. याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं विरोध केलाय.

एकीकडे संजय निरुपम कॉन्सर्टला विरोध करतायेत. पण दुसरीकडे काँग्रेसचेच माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मात्र कॉन्सर्टचं समर्थन केलंय. कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे काही नुकसान होणार नाही. राजकारण आणि हा कॉन्सर्ट दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काँग्रेसनं सास्कृतिक उपक्रमांना नेहमीच पाठिंबा दिलाय.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही या कॉन्सर्टवरून सरकारवर निशाणा साधलाय. मराठी कार्यक्रमासाठी कधी मदत केली नसेल पण या कॉन्सर्टसाठी करमणूक कर माफ करण्यात आलाय, अशी टीका नवाब मलिक यांनी केलीय. आता या कॉन्सर्टवरून थंडीच्या दिवसांतही राजकारण मात्र तापू लागलंय हेच खरं.

Loading Comments