Advertisement

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना पितृशोक


काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना पितृशोक
SHARES

मुंबई - ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते आणि दलितमित्र माधवराव सावंत यांचे रविवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांचे ते वडील होत.

माधवराव सावंत यांना 1995 साली दलितमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रायगड सहकारी बँकेसह विविध सहकारी संस्था त्यांनी उभारल्या. सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल वसंतदादा पाटील पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांचे ते जवळचे स्नेही होते. रायगड जिल्ह्यात राजकीय आणि सहकारी क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली आणि दोन मुले, नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे.

सोमवारी 6 मार्च रोजी सकाळी 10 वाजता कांदिवली येथील ठाकूर कॉम्पलेक्स परिसरातील सत्यम टॉवर येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. माधवराव सावंत यांच्यावर बोरिवलीतल्या स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते आणि दलितमित्र माधवराव सावंत यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपला.

- अशोक चव्हाण, खासदार, काँग्रेस

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा