Advertisement

काँग्रेसने दिली बंडखोरांना पुन्हा उमेदवारी


काँग्रेसने दिली बंडखोरांना पुन्हा उमेदवारी
SHARES

मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या 115 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यामध्ये पक्षात बंडखोरी करणाऱ्या दोन नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या भांडुपमधील सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आशा कोपरकर (110) आणि एम पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात मतदान करणाऱ्या उषा कांबळे (148) यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसच्या या पहिल्या यादीत नारायण राणे यांच्या समर्थकांचा वरचष्मा दिसून येत आहे. पहिल्या यादीत राणे समर्थक प्रवीण नलावडे, जगदीश अमीन कुट्टी, प्रियतमा सावंत, सीमा माहूरकर, सुप्रिया मोरे, विठ्ठल लोकरे(141) यांच्यासह अनेक समर्थकांची वर्णी लागली आहे. पहिल्या यादीत 19 विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी दिली आहे. माजी नगरसेवक राजेंद्र प्रसाद चौबे यांचा मुलगा अभय (03), नगरसेविका नेहा पायही यांचे वडील विनय (13), विद्यमान नगरसेवक शिवानंद शेट्टी याची बहीण विजयालक्ष्मी (16) आणि कार्यालयीन हायक आणि ओबीसी सेलच्या प्रमुख श्वेता कोरगावकर (09), अजंता यादव यांचे पती राजपती यादव (28), अंजी नगरसेवक प्रमोद मांद्रेकर यांच्या पत्नी प्रीती (219), माजी विरोध पक्षनेते ज्ञानराज निकम यांची कन्या निकिता (223) आदी नातेवाईकांना उमेदवारी देण्यात अली आहे.
याशिवाय माजी नगरसेवक पूरण दोषी (227), गौतम साबळे (151), विठ्ठल लोकरे आदींना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा