डेंग्युला महापालिका जबाबदार?

 Mumbai
डेंग्युला महापालिका जबाबदार?

फोर्ट - महापालिकेच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने मंगळवारी दुपारी आझाद मैदानात धरणे आंदोलनासह निदर्शने करण्यात आली. यंदा पावसाळ्यात मोठया प्रमाणात डेंग्यूची साथ पसरल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे 'मुंबई महापालिका डेंग्यूवर नियंत्रण ठेवण्यास अकार्यक्षम ठरली आहे', असा आरोप करत काँग्रेसने निदर्शन केली. यावेळी कुलाबाच्या नगरसेविका सुषमा शेखर, विनोद शेखर, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजकुमार झा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 'डेंग्यूची साथ पसरल्याचे घोषित करून सामाजिक बांधिलकी जपत यावर ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात', अशी मागणी नगरसेविका सुषमा शेखर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.

Loading Comments