काँग्रेस शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला

  Pali Hill
  काँग्रेस शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
  मुंबई  -  

  मुंबई - निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी राज्याचे पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात तात्काळ आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आलीय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळानं ही मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केलीय. राज्याचे पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे गडचिरोलीच्या निवडणूक अधिकाऱ्याला काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द करावा तसंच उमेदवाराला कपबशी चिन्ह द्यावे म्हणून दबाव टाकत असल्याची चित्रफीत एका वृत्तवाहिनीवर प्रसारीत झाली. त्यांचे हे कृत्य म्हणजे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात तात्काळ आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयोगाला निवेदन देऊन केलीय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.