Advertisement

ईडीवर बोलू नको, बीडी प्यायला लावतील – नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार हल्ला चढवला.

ईडीवर बोलू नको, बीडी प्यायला लावतील – नारायण राणे
SHARES

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. राऊतांच्या आरोपांना आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार हल्ला चढवला.

संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. हाच धागा पकडत ईडीवर बोलू नको, विडी प्यायला लावतील, असा जोरदार टोला राणेंनी लगावला आहे.

नारायण राणे म्हणाले की, ‘विकासावर बोला, ते बोलत नाही हा माणूस. जनतेच्या प्रश्नाचे विषय, आरोग्य खात्याच्या प्रश्नाबद्दल वृत्तपत्रांनी बातमी दिली, राज्याचा आरोग्यविभाग निधीअभावी अत्यवस्थ, अरे यावर काहीतरी बोल, राज्याची दयनीय अवस्था, प्रश्न सुटत नाही, एसटीचं आंदोलन सुरू आहे. पण काही नाही, इंडस्ट्री मिनीस्टर पत्राचाळीतून बंगल्यात गेले.

आता शिवसेनेत कोण नाहीय, आधी बाळासाहेबांवर टीका केली, उद्धवजींवर टीका केली. आता एक आरोप झालाय. पण ईडीवर बोलू नको, विडी प्यायला लावतील. मी कुणाला घाबरत नाही, तू शिवसेनेत आला कधी, शिवसेनेच्या जन्मानंतर २६ वर्षांनी आला. आम्ही शिवसेनेसाठी वाटा दिला, तू ५ पैसे तरी दिले का?, असा खोचक सवाल राणेंनी राऊतांना विचारलाय.

‘लोकप्रभात असताना, उद्धव आणि साहेब या दोघांवरही टीका करण्याचं सोडलं नव्हतं, आता म्हणतो, माननिय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वीदाने…तू पत्रकार नाहीच, संपादक नाही. तुझी भाषा त्या गुणवत्तेची नाहीच. बेकार आरोप करतो. हा काल अस्वस्थ का झाला, हा काल असा बेजाबदार का बोलत होता? प्रवीण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर याचा थयथयाट झाला. पत्रकार आहेस, दे पुरावा, तुझी जमीन, ५० एकर की ५० लाखात घेतली, बरं ते पैसे आणलेस कुठून? बरं हा सुजीत पाटकर कोण? त्याच्या कंपनीत तुझ्या मुली कशा डायरेक्टर असू शकतात? स्वत: आधी उत्तरं दे, स्वत:चं बोल. शिवसेना वाढवण्यासाठी नाहीय, याचं लक्ष्य उद्धव ठाकरे ज्या खुर्चीवर बसलेत ना तिथे आहे. हा अर्धा नाही, पूर्ण राष्ट्रवादीचा आहे’, असा जोरदार टोलाही राणेंनी लगावलाय.



हेही वाचा

बंगले ठाकरेंच्या नावे नाहीत मग टॅक्स कशाला भरता? - सोमय्या

किरीट सोमय्या 'मुलुंडचा दलाल' - संजय राऊत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा