Advertisement

किरीट सोमय्या 'मुलुंडचा दलाल' - संजय राऊत

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत टीकास्त्र सोडले.

किरीट सोमय्या 'मुलुंडचा दलाल' - संजय राऊत
SHARES

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत टीकास्त्र सोडले. किरीट सोमय्या यांच्यावर टीकेचा बाण सोडताना संजय राऊत यांनी त्यांचा उल्लेख 'मुलुंडचा दलाल' असा केला.

मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो, या या वेळेस ईडीची धाड पडणार.. हा काय प्रकार आहे? तुम्हांला काय वाटत आम्हीं झुकू? बाळासाहेबांनी आम्हाला शिकवल आहे, गुडघे टेकायचे नाहीत. तो 'दलाल' ज्याला मराठीत, शुद्ध मराठीत '***' म्हणतात त्यानं म्हटलं आहे की, ठाकरे कुटुंबानं कोरलाई गावात १९ बंगले बांधले आहेत. ही बेनामी प्रॉपर्टी आहे. माझं त्या दलालाला आव्हान आहे, हे आरोप सिद्ध करून दाखव.

किरीट सोमय्या यांच्या दररोजच्या पत्रकार परिषेदाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, 'ठाकरेंचे १९ बंगले अलिबागमध्ये दिसले, तर राजकारण सोडेन. बंगले दिसले नाहीत, तर सोमय्यांना शिवसैनिक जोड्याने मारेल.' सरकार पाडण्यात मदत नाही केली तर तपास यंत्रणा मागे लागतील, असं भाजप काही नेत्यांनी सांगितलं.

सरकार पाडण्यात मदत केली नाही तर केंद्रीय यंत्रणा टाईट करतील, असंही भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलं. भाजपच्या काही नेत्यांनी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. सरकार पाडण्यात मदत नाही केल्यास तपास यंत्रणा मागे लावू, असं भाजप नेत्यांकडून सांगितलं जात होतं.

या पत्रकार परिषदेला महापौर किशोरी पेडणेकर, आनंद आढसूळ, अरविंद सावंत,विनायक राऊत,अनिल देसाई,दादा भुसे ,दिवाकर रावते , उदय सामंत , प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे,सचिन अहिर,आदेश बांदेकर, मनीषा कायदे,गजानन कीर्तिकर, संजय शिरसाठ यांच्यासह अनेक शिवसेना खासदार, नेते आणि उपनेते उपस्थित होते.



हेही वाचा

फडणवीसांच्या काळात महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा : संजय राऊत

ते साडे तीन नेते कोण? हे उद्यापासून कळेल - संजय राऊत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा