Advertisement

ते साडे तीन नेते कोण? हे उद्यापासून कळेल - संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपविरोधात मोठे खुलासे केले आहेत. जाणून घ्या काय म्हणाले ते.

ते साडे तीन नेते कोण? हे उद्यापासून कळेल - संजय राऊत
SHARES

पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान दिलं.

मुंबईतल्या शिवसेना भवन इथं होत असलेल्या या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमदार, खासदारांना बोलवण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेना भवनाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

  • महाराष्ट्रातलं सरकार त्यांना पाडायचं आहे.
  • आमच्या नेत्यांना ब्लॅकमेल केलं जातंय.
  • नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून हल्ले केले जात आहेत.
  • सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रात ठिणगी पडेल.
  • भाजपच्या काही नेत्यांनी मला धमकी दिली की,सरकारमधून बाहेर नाही पडलात तर तपास यंत्रणा टाईट करतील.
  • धमकी दिल्याच्या तिसऱ्या दिवसांपासून धाडी घालण्यास सुरुवात. 
  • पवारांच्या कुटुंबियांच्या घरीही धाडी
  • केंद्रीय पोलीस दल आणल्याच्या धमक्या भाजपकडून दिल्या जात आहेत.
  • लोकांसमोर सत्य मांडण्याचा ठाकरेंचा आदेश

सोमय्या यांच्यावरही संजय राऊत यांचा हल्लाबोल

  • सोमय्या यांचा उल्लेख मुलुंडचा दलाल म्हणून संजय राऊत यांनी केलं.
  • हाच तो दलाल जो हायकोर्टात मराठी भाषा शाळांमध्ये सक्तीची नसावी यासाठी याचिका करतो.
  • उद्धव ठाकरेंचे १९ बंगले असल्याचा सोमय्यांचा आरोप
  • बंगले दिसले तर राजकारण सोडेन.
  • त्यानं केलेले आरोप खोटे
  • त्या दलालाचं तोंड आधी बंद करा, नाहीतर आम्ही करू
  • लोकांच्या मनात भ्रम निर्माण करत आहे.

ईडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह

  • माझ्या बँकेत आज ईडिचे लोक गेले.
  • गेल्या २० वर्षांचा हिशोब बँकेकडे मागितला.
  • ईडीकडून ५० गुंठे जमिनीचा तपास
  • माझ्या मुलीच्या लग्नातील मेंहदी वाला, नेलपॉलिश वाल्याची, कपडे शिवले तो टेलरचीही चौकशी केली.
  • विरोधात बोलण्यासाठी माझ्या अलिबागमधील गावकऱ्यांवरही दबाव टाकण्यात आला.
  • गुजरातमधील २२ हजार कोटींचा घोटाळा दिसला नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप

  • देवेंद्र फडणवीसांच्या काळात २५ हजार कोटींचा घोटाळा
  • महाआयटीत २५ हजार कोटींचा घोटाळा
  • पत्राचाळिशी शिवसेनेचा संबंध जोडण्याचा प्रयत्न
  • पीएमसी बँक घोटाळ्याचा सेनेशी संबंध जोडला.
  • पीएमसी घाटोळ्यात मोहित कंबोजचा हात
  • मोहित कंबोज देवेंद्र फडणवीस यांचा फ्रंटमॅन 

पीएमसी घोटाळ्यातील पैसा किरिट सोमय्यांना - संजय राऊत

  • वाधवाच्या खात्यातून भाजपाला २० कोटी
  • निकॉन इन्फ्रा कंस्ट्रक्शन कंपनी कोणाची?
  • वाधवानशी किरिट सोमय्यांचा थेट संबंध
  • किरिट सोमय्यांनी ब्लॅकमेल करून पैसा कमावला
  • निकॉनचा प्रकल्प बेकायदा आहे.
  • वसईत किरिट सोमय्यांनी जमीन घेतली
  • पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास ईडी करतेय
  • सोमय्यांविरोधातील कागदपत्र ईडीकडे ३ वेळा पाठवले.
  • हाच तो किरिट सोमय्या ईडीच्या ऑफिसात बसून खात असतो.
  • भाजपाचे लोक ईडीचे एजंट आहेत.
सोमय्या पिता-पुत्राला तातडीने अटक करा - संजय राऊत
  • किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना PMC घोटाळ्यातील आरोपांखाली तातडीने अटक करा
  • PMC बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानशी किरीट सोमय्यांचे आर्थिक संबध असून दोघेही पार्टनर असल्याचा मोठा खुलासा

बिल्डरांकडून होतेय वसूली - संजय राऊत

  • चार महिन्यांपासून ईडी बिल्डरांकडून वसूली करतेय.
  • ६० बिल्डरांकडून कोटी रुपये वसूल केले. 

कुटुंबियांना ईडीवाले टार्गेट करत आहेत - संजय राऊत

  • ईडीवाले लहान मुलांना देखील सोडत नाहीत.
  • ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना त्रास देत आहेत.
  • कुटुंबातील जवळचे, मित्र-परिवार यांना टार्गेट केले जात आहे.
मोदी आणि शाहा यांना राऊतांचा सवाल
  • 'माझ्याशी वैर असेल तर मला टॉर्चर करा, कुटुंबियांना का त्रास देता?, हीच का तुमची लोकशाही' असा सवाल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांना राऊतांनी केला आहे.

शिवसेनेचे भाजपला आव्हान

  • काहीही करा आम्ही घाबरणार नाही.
  • हम झुकेंगे नाही, आपको झुकाऐंगे.
संजय राऊत शिवसेना भवनात दाखल, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

संजय राऊत पत्रकार परिषदेसाठी शिवसेना भवनात दाखल, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी, थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होणार

दादरमध्ये येणाऱ्यांसाठी पोलिसांचं आवाहन


सेना भवनच्या बाहेर जय्यत तयारी

  • सेना भवनच्या बाहेर एलईडी स्क्रीन
  • ‘झुकेगा नही’ची पोस्टरबाजी
  • भवनाच्या बाहेर भव्य स्टेज उभारण्यात आला आहे.
  • शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदारांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित
  • शिवसेना भवनाबाहेर पदाधिकारी आणि सैनिकांची मोठी गर्दी

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या.

  • सुप्रिया सुळे - दुपारनंतर संजय राऊत सगळे चॅनेल टेक ओव्हर करतील.
  • प्रसाद लाड - संजय राऊतांनी स्व:ताची झोप वाचवावी, कोणाची झोप उडणार ते चार वाजण्याच्या आधीच राऊतांना कळेल.
  • अरविंद सावंत - शिवसेनेला केलेल्या जखमांची किंमत मोजावी लागेल.
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा