'इंदू सरकार'वर बोंबाबोंब, मधुर भंडारकरला काळे फासण्याची मागणी

Mumbai
'इंदू सरकार'वर बोंबाबोंब, मधुर भंडारकरला काळे फासण्याची मागणी
'इंदू सरकार'वर बोंबाबोंब, मधुर भंडारकरला काळे फासण्याची मागणी
See all
मुंबई  -  

चित्रपट निर्माते, दिग्दर्शक मधुर भंडारकर यांचा चित्रपट 'इंदू सरकार' प्रदर्शनाच्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा चित्रपट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात लावण्यात आलेल्या आणीबाणीवर आधारीत आहे. या चित्रपटात नेहरू-गांधी कुटुंबाचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी या चित्रपटाला विरोध सुरू केला आहे.

या विरोधासोबतच अलाहाबादच्या एका काँग्रेस नेत्याने या चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपये पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे.


काँग्रेस नेत्याचा विरोध

अलाहाबादमधील काँग्रेसचे नेते हसीब अहमद यांनी या चित्रपटाला विरोध दर्शवत एक वादग्रस्त पोस्टरदेखील प्रसिद्ध केले आहे. या पोस्टरमध्ये लिहिले आहे की, 'इंदू सरकार' या चित्रपटाद्वारे नेहरू-गांधी कुटुंबाची बदनामी करण्याचा कट रचण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्या चेहऱ्यावर काळे फासणाऱ्या योद्ध्याला 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.


छापले पोस्टर

सोशल नेटवर्कींग साईट्सवर व्हायरल झालेल्या या पोस्टरच्या एका बाजूला चित्रपटाचे अधिकृत पोस्टर छापण्यात आले असून दुसऱ्या बाजूला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे फोटो छापण्यात आले आहेत.प्रदर्शनावर बंदीची मागणी

या पोस्टरद्वारे सर्व मल्टीप्लेक्स आणि सिनेमागृहात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली आहे. हे वादग्रस्त पोस्टर छापल्यामुळे सध्या हसीब अहमद चर्चेत आहेत.अभिव्यक्तीवर घाला

या सर्व प्रकारावर व्यक्त होताना मधुर भंडारकर यांनी ट्विटरवर पोस्टरबाबत नाराजी दर्शवली आहे. त्यांनी आपल्या अकाऊंटवर या पोस्टरचा फोटो शेअर करून हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे म्हटले आहे. या पोस्टरवर त्यांचे समर्थकदेखील सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत. ज्यांत चित्रपट क्षेत्रातील अनेकांचा समावेश आहे.निरुपम यांना चित्रपट पाहायचाय

या चित्रपटाच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी 'सीबीएफसी' (केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळा)चे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना एक पत्रही लिहिले आहे. या पत्रात 'इंदू सरकार' चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर पाहण्यास मिळावा, अशी मागणी केली आहे.


नावे बदला

या चित्रपटाद्वारे काँग्रेसचे नेते इंदिरा गांधी, संजय गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांची प्रतिमा जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका निरुपम यांनी व्यक्त केली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटातून इंदिरा आणि संजय यांच्या पात्रांचे नावे बदलण्यासाठीही भंडारकर यांच्यावर दबाव टाकला जात आहे.


मी हा चित्रपट कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी बनवलेला नाही. माझ्या चित्रपटातील पात्रांची नावे बदलण्याची मागणी केली जात आहे. त्यावर मला विचार करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे.


मधुर भंडारकर, दिग्दर्शक

हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात नील नितीन मुकेश, किर्ती कुल्हारी आणि अनुपम खेर मुख्य भूमिकांमध्ये आहेत. नात्र जर पात्रांचे नावे बदलण्याचा निर्णय घेतला गेला, तर कदाचित चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर होण्याची शक्यता आहे.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.