नोटबंदीविरोधात काँग्रेस काढणार मोर्चा

 Fort
नोटबंदीविरोधात काँग्रेस काढणार मोर्चा
Fort, Mumbai  -  

सीएसटी - 1000-500 रुपयांच्या नोटबंदी विरोधात काँग्रेस आक्रमक झाले आहे. नोटबंदीचे 50 दिवस उलटूनही परिस्थिती जैसे थे असल्याने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे संपूर्ण देशात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात येणार आहे. मुंबईतही शनिवारी मुंबई काँग्रेसतर्फे नोटबंदी विरोधात उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.

सरकारने जाहीर करावे की 50 दिवसांत किती काळा पैसा जमा झाला आणि किती प्रमाणात भ्रष्टाचार संपला. बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा कधी उठवणार, देशातील संपूर्ण परिस्थिती पहिल्या सारखी पूर्वव्रत कधी होणार? जनतेला या नोटाबंदीच्या त्रासातून कधी दिलासा मिळेल? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाच घेतली की नाही? गरीब जनतेच्या कल्याणकारी योजना का बंद केल्या? अशा काही प्रश्नांची उत्तरे सरकारने त्वरित जाहीररीत्या जनतेला द्यावीत असे या निवेदन पत्रात नमूद केल्याचे संजय निरुपम यांनी सांगितले.

Loading Comments