Advertisement

संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत?, काँग्रेसचा संताप

संजय राऊत काहीही बोलतात आणि गोत्यात येतात, असं बऱ्याचदा घडलं आहे.

संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत?, काँग्रेसचा संताप
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) चं अध्यक्षपद भूषवायला हवं, असं वक्तव्य नुकतंच शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांना हास्यास्पद वक्तव्य करण्याची सवयच आहे, अशी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत काहीही बोलतात आणि गोत्यात येतात, असं बऱ्याचदा घडलं आहे. संजय राऊत हे शरद पवारांचे (sharad pawar) खास शिष्य आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, असा गोंधळ निर्माण झालेला आहे.

हेही वाचा- 'तो' अहवाल फुसकी लवंगी की अॅटोम बॉम्ब लवकरच कळेल – फडणवीस

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असलं, तरी शिवसेना अजूनही यूपीएमध्ये सामील झालेली नाही. असं असताना यूपीएचं प्रमुख कोण होणार, हे सांगण्याचा तुम्हाला अधिकार कुणी दिला? सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे काँग्रेसच्या (congress) तुलनेत थोड्या जास्त जागा आहेत. म्हणून लगेच राष्ट्रवादीकडे यूपीएचं अध्यक्षपद जावं, असं स्वत: शरद पवारही म्हणणार नाहीत. काँग्रेस पक्ष हा आजही राष्ट्रवादीच्या तुलनेत मजबूत असून देशातील तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. त्यातुलनेत राष्ट्रवादी केवळ काही मर्यादित भागांमध्येच ताकद असलेला पक्ष आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमुळे काँग्रेसचं अस्तित्व नसून काँग्रेसमुळे हे सरकार बनलेलं आहे, हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वैचारिक मतभिन्नता असूनही केवळ भाजपचा (bjp) विरोध करण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रित आले आहेत. त्यामुळे कुठलंही वक्तव्य करताना विनाकारण वाद होणार नाही, याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, अशा तीव्र शब्दांत हुसेन दलवाई यांनी संजय राऊत यांना सुनावलं आहे. 

(congress mp hussain dalwai slams sanjay raut over UPA president post)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा