Advertisement

आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, निरूपम यांचा राज यांना सल्ला

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी ''आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि मगच राज यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं,'' अस म्हणत राज यांना आयता सल्ला दिला आहे.

आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, निरूपम यांचा राज यांना सल्ला
SHARES
Advertisement

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच उत्तर भारतीयांच्या मंचावर उपस्थित राहून उत्तर भारतीयांसोबत संवाद साधणार आहेत. मात्र हा संवाद साधण्याआधीच त्यांच्या उपस्थितीवरून राजकारण तापायला लागलं आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी ''आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि मगच राज यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं,'' अस म्हणत राज यांना आयता सल्ला प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.


काय म्हणाले निरूपम?

- स्वत: चा पक्ष वाढवण्यासाठी कुणी कुणालाही भेटू शकतं यात दुमत नाही. पण राज ठाकरे यांचं उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं म्हणजे निव्वळ स्टंटबाजी आहे.

- राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष मनसेने उत्तर भारतीयांचा मागील अनेक वर्षांपासून छळ केला आहे. त्यांना मारलं आहे, त्यांच्यावर सातत्याने अन्याय केला आहे.

- त्यामुळे राज यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी. उत्तर भारतीय समाज त्यांना नक्की स्वीकारेल.

उत्तर भारतीय महापंचायतने दिलेल्या निमंत्रणावरून राज ठाकरे २ डिसेंबर रोजी कांदिवलीतील भुराभाई हाॅलमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.हेही वाचा-

राज ठाकरे दिसणार उत्तर भारतीयांच्या मंचावर

मुनगंटीवार ठोकणार निरूपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावासंबंधित विषय
Advertisement