काँग्रेस, राष्ट्रवादीचं जमेना...

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजार-पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या आणि काँग्रेसला भाजपावर टीका करण्याची आयती संधी मिळाली. मग काय भाजपा सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी काँग्रेसनं उपसलं आक्रोश रॅलीचं हत्यार.

काँग्रेसनं काढलेल्या या आक्रोश रॅलीला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे मुंबई शहर अध्यक्ष सचिन अहिर यांनी या आक्रोश रॅलीत हजेरी लावली. मात्र काँग्रेस नेत्यांकडून भाषणावेळी काँग्रेसच्याच केंद्रीय आणि राज्यातील नेत्यांच्या नावाची घोषणाबाजी होतं असल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चेतावले आणि त्यांनीही आपल्या नेत्यांच्या नावाची घोषणाबाजी करत कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. अखेर सचिन अहिर यांना माईक घेत आपल्या कार्यकर्त्यांना शांत रहाण्याचं आवाहन करावं लागलं. एकूणच आक्रोश रॅलीच्या निमित्तानं पुन्हा एकदा दोन्ही पक्षांचे मतभेद समोर आलेत. त्यामुळे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असंच या दोन्ही पक्षांच्या बाबतीत म्हणावं लागेल.

Loading Comments