Advertisement

मोदी सरकारवर जोरदार टीका


मोदी सरकारवर जोरदार टीका
SHARES

वडाळा - वडाळा तालुका अध्यक्ष सुरेश काळे यांच्या वतीनं दादर- नायगाव येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी वडाळा तालुका काँग्रेस कमिटी- एस. सी. सेल च्या नवीन तालुका पदाधिकाऱ्यांना आणि प्रभाग अध्यक्ष यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आली.

या मेळाव्यात माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
अच्छे दिन दाखवणाऱ्या मोदींनी जनतेला महागाईच्या दलदलीत टाकलं, असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. काँग्रेस पक्षात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा असं आवाहन ही या वेळी त्यांनी केलं. तर मराठ्यांना आरक्षण द्या, मात्र त्यांना आरक्षण देताना अँट्रॉसिटी अँक्टला धक्का लावण्याचे काम करू नका, अन्यथा हा समाज सरकार विरोधात पेटून उठेल असा संतप्त इशारा एस. सी. सेलचे अध्यक्ष कचरू यादव यांनी दिला. या वेळी आमदार कालिदास कोळबंकर, जिल्हा अध्यक्ष हुकूमचंद मेहता, नगरसेवक सुनिल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा