Advertisement

काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांची आत्महत्या


काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांची आत्महत्या
SHARES

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते आणि सरचिटणीस महादेव शेलार यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शेलार यांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही समजलेले नाही. 

मुलुंडमधील एलबीएस रोडवरील बिलवा कुंज येथील राहत्या घरी महादेव शेलार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना मुलुंडमधील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण डाॅक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी पंचनामा सुरू असून, घाटकोपरमधील राजावाडी हॉस्पिटलमध्ये महादेव शेलार यांचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे.


अभ्यासू आणि संयमी

अॅड. महादेव शेलार यांची राजकीय वर्तुळात अभ्यासू आणि सुसंस्कृत नेते म्हणून ओळख होती. २०१४ साली केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार येण्यापूर्वी भाजपचे विविध नेते काँग्रेसवर कडवी टीका करायचे. तरीही प्रसिद्धी माध्यमांपुढे काँग्रेस पक्षाची बाजू मांडताना ते नेहमीच अत्यंत अतिशय संयमाने आणि अभ्यासपूर्ण वक्तव्य करायचे. 



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा