Advertisement

कंगनाच्या ट्विटमुळे भाजपचा चेहरा उघड- काँग्रेस

महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी ही भाजपला खूश करण्यासाठी होती. कंगना रणौतच्या ट्विटवरून हे सिद्ध होत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

कंगनाच्या ट्विटमुळे भाजपचा चेहरा उघड- काँग्रेस
SHARES

महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी ही भाजपला खूश करण्यासाठी होती. कंगना रणौतच्या ट्विटवरून हे सिद्ध होत असल्याचा दावा काँग्रेसने (congress) केला आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी खारमध्ये घेतलेल्या आॅफिसवरून टीका करताना कंगनाने जे ट्विट केलं, त्या ट्विटचा आधार घेऊन काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडलं आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईतील खार इथं सुमारे ३ कोटी रुपयांचं नवीन कार्यालय खरेदी केलं आहे. यावर निशाणा साधताना कंगनाने ट्विट केलं की, 'मी स्वत:च्या कष्टानं बांधलेलं घरही काँग्रेसनं तोडून टाकलं. भाजपला खूष करून माझ्या मागे फक्त २५-३० कोर्टाचे खटले लागले. मी सुद्धा हुशारीनं काँग्रेसला खूष केलं असतं तर बरं झालं असतं. मी खरंच मूर्ख आहे,' 

त्यावर उर्मिला मातोंडकर यांनी ताबडतोब एक व्हिडिओ जारी करून कंगनाला उत्तर दिलं आहे. मागील वीस ते तीस वर्षांच्या मेहनतीने मी जो फ्लॅट खरेदी केला होता, तो फ्लॅट विकून त्यातून मिळालेल्या पैशांमधून मी हे आॅफिस खरेदी केलं आहे. या आॅफिस खरेदीचा आणि राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. कारण मी राजकारणात येण्याआधीचे हे सर्व व्यवहार आहेत. वाटलंस तर वेळ आणि जागा तू सांग. माझ्या खरेदीच्या व्यवहाराची कागदपत्रे घेऊन मी तुला भेटायला येते. त्याबदल्यात ड्रग्ज कनेक्शन संदर्भात तुझ्याकडे जी लिस्ट आहे, जी तून एनसीबीला देण्याचं आश्वासन दिलं होतं, ती लिस्ट घेऊन ये, असं आव्हान देखील दिलं. 

हेही वाचा- उर्मिलाच्या इन्स्टाग्राम हॅक प्रकरणी गुन्हा दाखल

या सगळ्या आरोप-प्रत्यारोपाचा आधार घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी कंगनाचं ट्वीट रीट्वीट करत भाजपला लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी ही भाजपाला (bjp) खूश करण्यासाठी होती. 

भाजप महाराष्ट्र या कटाची सूत्रधार होती. कंगना रणौतचं ट्विट याचा हा कबूलनामा आहे. भाजपाने नाक घासून महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही. जाहीर निषेध!, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

कंगनाचं घर तुटण्याशी काँग्रेसचा अजिबात संबंध नाही. कारण मुंबई महापालिकेत (bmc) काँग्रेस विरोधी पक्षात आहे, असा खुलासा देखील सावंत यांनी केला आहे. सोबतच एनसीबीला कंगनाच्या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी देखील पुन्हा एकदा केली आहे.

(congress spokesperson sachin sawant alleges bjp for defamation of mumbai police through kangana ranaut)

हेही वाचा- कंगनाला दिंडोशी न्यायालयाचा झटका, तर पडू शकतो घरावर हातोडा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा