काँग्रेस घालणार रिझर्व्ह बॅंकेला घेराव


SHARE

मुंबई - काँग्रेसची नोटबंदी विरोधी आंदोलन समितीची बैठक मुंबईत नुकतीच झाली. बैठकीत येत्या 18 जानेवारीला मुंबई आणि नागपूर येथील रिझर्व्ह बॅंकेला काँग्रेस नोटबंदी विरोधी आंदोलन समिती घेराव घालणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी टिळकभवन येथे दिली. येत्या २९ जानेवारीला मुंबईत नोटबंदीबाबत काँग्रेस पक्षाचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नोटबंदीमुळे लोकांना त्रास होतोय. आम्ही लोकांसोबत आहोत, असं सुशीलकुमार शिंदे या वेळी म्हणाले. रिझर्व्ह बॅंकेची स्वायतत्ता मोदी सरकारने घालवली असून नोटबंदीचा हुकूमशाही निर्णय पंतप्रधानांनी घेतला असल्याचा आरोप ही शिंदे यांनी या वेळी केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या