बालेकिल्ला टिकवण्यासाठी काँग्रेसची धडपड

  Kandivali
  बालेकिल्ला टिकवण्यासाठी काँग्रेसची धडपड
  मुंबई  -  

  कांदिवली - कांदिवलीतील काँग्रेसचे वर्चस्व टिकवण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरु आहे, त्याअनुषंगाने विविध कार्यक्रम हाती घेण्यात येतायत. बुधवारी ठाकूर कॉम्प्लेक्स येथे काँग्रेसच्यावतीने दिपावली स्नेह संम्मेलन व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यानंतर गुरुवारी कांदिवली पश्चिमेकडील इराणीवाडी येथे बाटी चोखा व स्नेह सम्मेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुंबई शहर कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरूपम स्वतः हजर होते. कांदिवली पूर्वेकडे कॉंग्रेसचे 4 व पश्चिमेकडे 2 असे काँग्रेसचे विदयमान नगरसेवक आहेत. त्यातील सागर ठाकूर हे भाजपच्या वाटेवर गेल्याने कॉंग्रेसकडे 5 नगरसेवक आहेत. या संख्येपेक्षा अधिक उमेदवार कांदिवलीतून जिंकून आणून ठाकूरांना धक्का देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.