कोरोना विषाणूविरुद्धच्या (coronavirus) लढ्यात महाराष्ट्रातील जनता देखील शासनासोबत सहभागी झाली असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वेगवेगळ्या प्रकारे मदत जमा केली जात आहे. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ( cm relief fund maharashtra) आतापर्यंत २४७ कोटी रुपये जमा झाले आहेत.
मोलाची साथ
कोराना विषाणूविरुद्ध (covid-19) लढताना आपली एकजूट, सहकार्याचे हात आणि मोलाची साथ मला अपेक्षित आहे, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी व्यक्त केली होती. याच भावनेला राज्यातील दानशूर जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आणि या विषाणूविरुद्ध लढण्याची तयारी दाखवली. ज्यांना जी जी मदत करणे शक्य होते त्यांनी त्या मदतीसाठी हात पुढे केले. मदतीचे धनादेश, वस्तू, अन्नधान्याचा पुरवठा, गोरगरीब-अडकून पडलेल्या जनतेच्या जेवणाची व्यवस्था अशा नानाविध स्वरूपातून मदतीचे हे हात पुढे येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.
हेही वाचा - महापालिकेने बदलले कोरोना चाचणीचे नियम
कोरोना विषाणू विरुद्ध लढताना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19 हे स्वतंत्र खाते उघडण्यात आलं असून त्याचा बचतखाते क्रमांक 39239591720 आहे.
खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
मराठीत खाते क्रमांक पुढीलप्रमाणे आहे :
सदर देणग्यांना आयकर अधिनियम १९६१ च्या ८० (जी) नुसार आयकर कपातीतून १०० टक्के सूट देण्यात येते. या खात्यात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केलं आहे.
हेही वाचा - २० एप्रिलनंतर ‘या’ अटींवर सुरू होणार महाराष्ट्रातील उद्योग