Advertisement

महापालिकेने बदलले कोरोना चाचणीचे नियम

मुंबई महानगरपालिकेने आतो कोरोना संशयितांच्या नमुन्यांच्या चाचणीचे नियम बदलले आहेत.

महापालिकेने बदलले कोरोना चाचणीचे नियम
SHARES

मुंबई महानगरपालिकेने आतो कोरोना संशयितांच्या नमुन्यांच्या चाचणीचे नियम बदलले आहेत. आता फक्त कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या लोकांचीच चाचणी केली जाणार आहे. याआधी पालिका  कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची तात्काळ चाचणी करायची. त्यामुळे त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह यायचा. मात्र त्याच व्यक्तीला काही दिवसाने कोरोना झाल्याचं दिसून यायचं. त्यामुळे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची चाचणी तात्काळ न करता 5 दिवसांच्या देखरेखीनंतरच करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 

पालिकेने याबाबत एक परिपत्रक काढलं आहे. कोरोनाबाधिताच्या घरातील व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत नसतील तर त्याची तात्काळ तपासणी करण्यात येणार नाही, असं पालिकेने या परिपत्रकात म्हटलं आहे.  कोरोनाबाधितांच्या संपर्कातील लोकांमध्ये तात्काळ लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे 5 दिवस देखरेख करूनच त्यांची चाचणी करण्यात यावी, असं या परिपत्रकात नमूद केलं आहे. हा निर्णय इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR च्या निर्देशाप्रमाणे घेण्यात आला.  

कोरोनाची लक्षणे 5 ते 14 दिवसांच्या आत दिसून येतात. त्यामुळे संशयितांची आधीच तपासणी केल्यास  चाचणी निगेटिव्ह येते. 5 दिवसानंतरच ही चाचणी केली तर पॉझिटिव्ह केसेसची माहिती मिळू शकते. त्यामुळे रुग्णांना वाचवता येऊ शकतं.



हेही वाचा -

लॉकडाऊनमुळं पश्चिम रेल्वेला ४२७ कोटीचे नुकसान

Coronavirus Update : हिरो मोटोकॉर्पकडून ६० मोबाईल अँब्युलन्स




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा