Advertisement

वांद्र्यातील घटनेमागचा सूत्रधार शोधा, विनोद तावडेंची मागणी

लॉकऊनच्या (lockdown) काळात वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजूर जमा होण्याची घटना हे राज्य सरकारचं अपयश आहे.

वांद्र्यातील घटनेमागचा सूत्रधार शोधा, विनोद तावडेंची मागणी
SHARES

लॉकऊनच्या (lockdown) काळात वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजूर जमा होण्याची घटना हे राज्य सरकारचं अपयश आहे. या घटनेमागील खरा सूत्रधार शोधून या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे नेते विनोद तावडे (bjp leader vinod tawde) यांनी केली आहे.

काय म्हणाले तावडे?

वांद्र्यात जे प्रकरण (mob in bandra during lockdown in mumbai) घडलं त्याला जबाबदार धरून एका पत्रकाराला झालेली अटक हे अतिशय संतापजनक आहे. कुणी सोशल मीडियावर सरकारविरोधात व्हिडिओ टाकले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले हे देखील निषेधार्ह आहे. एका मराठी वाहिनीवरील बातमी ऐकून हजारो बिगरमराठी लोकं एखाद्या ठिकाणी जमतात हा कुठला शोध आहे? मला असं वाटतं की सरकारला मुस्कटदाबी करायची आहे. 

हेही वाचा - हे तर राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचं अपयश, वांद्र्यातील घटनेवरून राणेंचा प्रहार

मातोश्राीपासून फर्लांगभर अंतरावर हजारो लोकं जमतात, तरी शासनाला कळत नाही हे शासनाचं अपयश आहे. त्यांच्यावर सरकार काय कारवाई करणार हे जनतेला जाणून घ्यायचं आहे. विरोधक कुणाचा राजीनामा मागत नाहीत आणि कुणालाही बदनाम करत नाहीत. नाका कामगारांच्या डाव्या संघटना कुणाच्या आहेत, याची चौकशी करा. त्याच्यावर कारवाई करा वास्तव बाहेर येईल. 

सर्वसामान्यांना निधीवाटप का नाही?

केंद्र सरकार आपल्या विविध खात्यांचा निधी वापरण्यासोबत अधिकचा निधी सर्वसामान्यांसाठी खर्च करत आहे. दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात निधी जमा केला जात आहे. त्याचा सर्वसामान्यांना फायदाही होत आहे. अशा स्थितीत आरोग्य विभाग सोडलं, तर सरकारमधील एकही खात्याकडून लोकांसाठी निधीचा खर्च होताना दिसत नाही. पाटबंधारे, बांधकाम खात्याच्या ठेकेदारांची बिलं सरकारकडून दिली जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कापला जात आहे. हे कसं काय होतंय याचं उत्तर राज्यातल्या जनतेला हवं आहे. 

हेही वाचा - राज ठाकरेंचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी ‘असा’ ऐकला, दुसऱ्याच दिवशी अंमलबजावणी

दरम्यान, राज्यात लॉकडाऊन (lockdown) असताना, जमावबंदी आदेश लागू असताना वांद्र्यात (Bandra incidence) हजारोंच्या संख्येने लोकं जमलेच कसे? तब्बल ३ ते ४ हजार लोकं जमेपर्यंत सरकार काय वाट बघत होतं का? संचारबंदीतही एवढ्या मोठ्या संख्येने लोकं जमणं हे राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचं अपयश असल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे (bjp mp narayan rane) यांनी सरकारवर केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा