Advertisement

केशरी रेशन कार्डधारकांनाही मिळेल सवलतीच्या दरात धान्य, मंत्रिमंडळाचा निर्णय

एप्रिल ते जून २०२० या कालावधीत केशरी रेशन कार्डधारकांना रेशन दुकानांतून सवलतीच्या दरानं धान्य देण्यात येईल. याचा राज्यातील ३ कोटी रेशरी रेशन कार्ड असलेल्या नागरिकांना फायदा होणार आहे.

केशरी रेशन कार्डधारकांनाही मिळेल सवलतीच्या दरात धान्य, मंत्रिमंडळाचा निर्णय
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीत नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी केशरी रंगाचं रेशन कार्ड (saffron ration card) असलेल्या नागरिकांनाही सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (cabinet meeting) घेण्यात आला. एप्रिल ते जून २०२० या कालावधीत केशरी रेशन कार्डधारकांना रेशन दुकानांतून सवलतीच्या दरानं धान्य देण्यात येईल. याचा राज्यातील ३ कोटी रेशरी रेशन कार्ड असलेल्या नागरिकांना फायदा होणार आहे. 

लाभ मिळत नाही

राज्यातील ३ कोटी केशरी रेशन कार्डधारकांपैकी ग्रामीण भागात साधारणपणे ४९ हजार पेक्षा कमी आणि नागरी भागात साधारणपणे ५९ हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी रेशन कार्ड धारकांनाच २ रुपये किलो दराने तांदूळ आणि ३ रू दराने गहू मिळतो. यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या केशरी कार्डधारकांना रेशनच्या धान्याचा (low cost grains) लाभ मिळत नाही. 

हेही वाचा- लोकं १४ एप्रिलनंतर घरात राहण्याच्या मन:स्थितीत नाही- हसन मुश्रीफ

इतक्या दराने 

मात्र मंत्रिमंडळ बैठकीत केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत  मान्यता देण्यात आली.  त्यांना ८ रुपये प्रती किलो गहू आणि १२ रुपये प्रती किलो तांदूळ अशा दरात धान्य मिळेल.  या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  पत्र लिहून संबंधित मंत्रालयाला आवश्यक ते निर्देश देण्याची विनंती देखील केली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या ३ कोटी ८ लाख केशरी रेशन कार्डधारकांना याचा फायदा होईल.  त्यासाठी सुमारे २५० कोटी खर्च येणार असून मे आणि जून या महिन्यासाठी हे धान्य देण्यात येईल.

सध्या जे धान्य केंद्र सरकारकडून मिळतं त्या व्यतिरिक्त १ लाख ५४ हजार २२० मेट्रिक टन धान्याची मागणी यासाठी करण्यात आली आहे.  नैसर्गिक आपत्तीमध्ये किमान आधारभूत किंमतीच्या दराने धान्य देण्याबाबत केंद्राचे जे धोरण आहे, त्याला अनुसरुनच सवलतीच्या दरात धान्य मिळावं, अशी मागणी पंतप्रधानांना करण्यात आली आहे.

हेही वाचा - मुंबईतले ‘हे’ ४ वाॅर्ड अतिधाेकादायक, जपून राहण्याचा प्रशासनाचा सल्ला

सर्वांचा विचार व्हावा

राज्यसरकार कडून दरमहा ७ कोटी १७ हजार शिधापत्रिकाधारकांना सुमारे ३.८३ लाख मेट्रिक टन इतकं अन्नधान्य राज्यातील एकूण ५२ हजार ४२४ रेशन दुकानांतून अल्पदरात वितरित करण्यात येतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार (maha vikas aghadi government) हातावर पोट असलेल्या गरजूंसाठी  अन्नधान्याच्या विविध योजना राबवत आहे. कोरोनाचा फटका राज्यातील मध्यमवर्गीय जनतेलाही बसला आहे. त्यामुळे  सर्वच नागरिकांना मदत करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार केशरी रेशन कार्डधारकांचाही राज्य सरकारने योग्य तो विचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा