लोकं १४ एप्रिलनंतर घरात राहण्याच्या मन:स्थितीत नाही- हसन मुश्रीफ

कोरोनाचे रूग्ण (corona patient) नसलेल्या भागातील लाॅकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात यावा, असं माझं वैयक्तिक मत आहे, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

लोकं १४ एप्रिलनंतर घरात राहण्याच्या मन:स्थितीत नाही- हसन मुश्रीफ
SHARES

देशात १४ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन (lockdown) घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जनता कळ सोसून कशीबशी घरात बसत आहे. पण १४ एप्रिलनंतर लोकं घरात राहण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामळे कोरोनाचे रूग्ण (corona patient) नसलेल्या भागातील लाॅकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात यावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु याबाबतचा अंतिम निर्णय हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) हेच घेतील, असं मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं. 

आर्थिक अवस्था बिकट

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या हसन मुश्रीफ (rural development minister hasan mushrif) यांनी मंगळवारी शहराचा आढावा घेतला. यावेळी ते पुढं म्हणाले की, लाॅकडाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. हातावर पोट भरणाऱ्या गरीब घरातील लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाॅकडाऊन असंच पुढं काही दिवस सुरू राहिल्यास लोकांची आर्थिक स्थिती आणखी बिकट होईल, त्यामुळे ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण नाही, अशा भागात १४ एप्रिलनंतर लाॅकडाऊन काही प्रमाणात शिथील करावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. 

हेही वाचा- हनुमानासारखं पर्वत उचलायला घराबाहेर पडू नका- अजित पवार

गावाच्या सीमा बंद

त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे १४ एप्रिलपर्यंत लोकं कळ सोसून घरात राहात आहेत. पण त्यानंतर घरात बसण्याची त्यांची मन:स्थिती दिसून येत नाहीय. त्यामुळे खासकरून ग्रामीण भागातील लाॅकडाऊन काही प्रमाणात शिथील करावा. ज्या गावात लॉकडाऊन शिथिल करण्यात येईल. त्या गावात इतरांना प्रवेश मिळता कामा नये. त्यासाठी संबंधित गावाच्या सीमा १०० टक्के बंद करण्यात याव्यात. लाॅकडाऊनबाबतचं माझं वैयक्तिक मत तसंच लोकांच्या भावना मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देईन, असंही मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज शेकड्यांनी वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवलं पाहिजे. शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदी आदेश जारी केले आहेत. कोरोनासंसर्गाची (coronavirus) साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, कोरोनाला प्रसाराची संधी न देणं आणि करोनाची साखळी तोडणं, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातंच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये, असं उमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

हेही वाचा- ‘कोरोनाशी लढताना उद्धव ठाकरेंसारख्या सेनापतीची गरज’


संबंधित विषय