Advertisement

Coronavirus: हे अन्न फक्त मुस्लिमांसाठीच... पाकिस्तानात हिंदूंसोबत असाही भेदभाव!

पाकिस्तानातील कोरोनाग्रस्त भागात मदत करताना स्थानिक हिंदूंसोबत (hindu) भेदभाव हाेत असल्याचं समोर आलं आहे.

Coronavirus: हे अन्न फक्त मुस्लिमांसाठीच... पाकिस्तानात हिंदूंसोबत असाही भेदभाव!
SHARES

कोरोना व्हायरसचा (Coronavirus,) मुकाबला करण्यासाठी सारं जग एकवटेलं असताना पाकिस्तानात (pakistan) मात्र माणुसकीच्या नावाला काळीमा फासला जात आहे. ज्या ज्या देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे, अशा देशातील नागरिक धर्म, जात, रंग, लिंग, गरीब-श्रीमंत असे सारे भेद विसरुन एकमेकांना मदत करत आहेत. अशा स्थितीतही पाकिस्तानातील कोरोनाग्रस्त भागात मदत करताना स्थानिक हिंदूंसोबत (hindu) भेदभाव होत असल्याचं समोर आलं आहे.  

इतर देशांप्रमाणे पाकिस्तानातही कोरोनाचा (covid-19) विळखा हळुहळू वाढत चालला आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत १५९३ जण करोनाबाधित झाले असून यापैकी १६ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे पंजाब प्रातांत ५९३ आणि सिंध प्रातांत ५०२ आढळून आले आहेत.

या प्रांतात लाॅकडाऊन

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाकिस्तानी सरकारने पंजाब आणि सिंध प्रातांत (punjab and sindh province) इतर देशांप्रमाणेच लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे स्थानिक कामगार आणि नागरिकांना स्वयंसेवी संस्था, प्रशासनाच्यावतीने अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्याचे आदेश सिंध प्रांताच्या सरकारने दिले आहेत. मात्र, सरकारच्या या आदेशाला हरताळ फासण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे. 

भेदभावाची वागणूक

प्रशासनाकडून अन्नधान्य आणि ज्या जीवनावश्यक वस्तू (essentials) वाटल्या जात आहेत, त्या फक्त मुस्लिमांनाच दिल्या जात आहेत, हिंदूंना या वस्तू प्रशासनाकडून देण्यात येत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरून स्थानिक मानवाधिकार व राजकीय कार्यकर्त्यांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.

उपासमारीचा सामना

ल्यारी, सचर घोठ, कराची व इतर भागात राहणाऱ्या अल्पसंख्याक हिंदू समुदायाला प्रशासनाकडून अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळत नसल्याने हा समुदाय सध्या उपासमारीचा सामना करत आहे. अन्नधान्य फक्त मुस्लिमांसाठी असून हिंदूसाठी नसल्याचं त्यांना प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. अशा संकटाच्या काळात करण्यात येणारा हा भेदभाव माणुसकीला धरून नसल्याचं मानवाधिकार व राजकीय कार्यकर्ते डॉ. अमजद अय्यूब मिर्झा यांनी सांगितलं.


संबंधित विषय
Advertisement