Advertisement

पत्रकारांची देखील कोविड चाचणी करा, उद्योगमंत्र्यांचे निर्देश

उद्योगमंत्री सुभाष देसाई (industries minister subhash desai) यांनी तात्काळ मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याशी संपर्क साधून या सर्व माध्यमातील (journalist) प्रतिनिधींची चाचणी करण्याचे निर्देश दिले.

पत्रकारांची देखील कोविड चाचणी करा, उद्योगमंत्र्यांचे निर्देश
SHARES

मुंबईतील एका नामांकित वाहिनीच्या पत्रकाराची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह (coronavirus positive) आल्याने तसंच इतरही अनेक चॅनल्स असलेल्या एका मोठ्या समूहाच्या सुमारे ६ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याने उद्योगमंत्री सुभाष देसाई (industries minister subhash desai) यांनी तात्काळ मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याशी संपर्क साधून या सर्व माध्यमातील (journalist) प्रतिनिधींची चाचणी करण्याचे निर्देश दिले. 

हेही वाचा - मुंबईत 'ड्राइव्ह इन टेस्ट'ला सुरूवात, गाडीतच बसूनच होणार कोरोनाची चाचणी

वृत्तवाहिन्यांचे (channels) सर्वच प्रतिनिधी अहोरात्र बातम्या प्रसारणाचं काम करीत आहेत त्यांचं हे काम जोखमीचे असून त्यांनी आपले स्वास्थ्य सांभाळून काम करावं तसंच त्यांच्या सर्वत्र फिरण्यावर बंधने असावीत जेणेकरुन त्यांच्या आरोग्याची काळजी घेता येईल.

यासाठी शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने (maharashtra government) वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांची चाचणी करण्यासाठी देसाई यांनी महासंचालक, माहिती व जनसंपर्क यांनाही सूचना दिल्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा