Advertisement

वांद्र्यातील गर्दी ही तर जनक्षोभाची सुरूवात, कष्टकऱ्यांची वेळीच सोय करा- प्रकाश आंबेडकर

शासनाने योग्य ते पाऊल उचललं नाही तर त्याचा उद्रेक देशभर होईल, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Vba chief prakash ambedkar) यांनी केंद्र सरकारला इशारा दिला.

वांद्र्यातील गर्दी ही तर जनक्षोभाची सुरूवात, कष्टकऱ्यांची वेळीच सोय करा- प्रकाश आंबेडकर
SHARES

लॉकडाऊनला (lockdown) विरोध करण्यास आता सुरुवात झाली असून मुंबईतील वांद्रे इथं जमलेली पयप्रांतीय मजुरांची (migrant workers) गर्दी हे त्याचं उदाहरण आहे. लॉकडाऊन वाढवल्याने हातावर पोट असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येईल, असं त्यांना वाटू लागल्याने, त्यांनी लाॅकडाऊनला आपला विरोध दर्शवला. शासनाकडे अन्नधान्याचा साठा पुरेसा असूनही त्याचं मोफत वाटप झालं नाही, म्हणून त्याचा उद्रेक वांद्रे इथं झाला. शासनाने योग्य ते पाऊल उचललं नाही तर त्याचा उद्रेक देशभर होईल, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Vba chief prakash ambedkar) यांनी केंद्र सरकारला इशारा दिला. 

हेही वाचा- विनय दुबेचा मनसेशी संबंध काय? ‘हे’ आहे खरं कारण


काय म्हणाले आंबेडकर? 

सोशल मीडियावरून संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले. वांद्र्यात हजाराेंच्या जमावाने (bandra rush against lockdown) लाॅकडाऊन विरोधात आवाज उठवला. हे सगळे सगळेजणं अशी माणसं आहेत की ज्यांचं पोट हातावर आहे. ३ मे पर्यंत लाॅकडाऊन कायम ठेवण्यात आल्याने आता आपल्यावर उपासमारीची (hunger) वेळ येणार आहे हे त्यांनी निदर्शनास आणून दिलं. शासनाकडे मोठ्या प्रमाणात अन्नधान्य पडलेलं आहे, त्यामुळे पुढचे २ महिने हे अन्नधान्य शासनाने मोफत वाटलं पाहिजे, अशी विनंती मी शासनाला अनेकदा केली होती. पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष करून हे धान्य मोफत वाटलं नाही. त्यातूनच वांद्रे प्रकरण घडलं.

गुणगाण गाण्यात मश्गुल

लोकांना आश्वासीत करण्याऐवजी आपण कोरोना (coronavirus) कसा थांबवला याचंच गुणगाण गायलं जातंय. परंतु ज्यांचं पोट हातवर आहे, त्यांना आम्ही काय सुविध देणार याविषय बोललं जात नाही. त्यामुळे हातावर पोट असलेल्यांची योग्य सोय केली नाही, तर महाराष्ट्रभर हे उठाव होतील आणि हे उठाव पुढं देशभर दिसू लागली. त्यामुळे आताच जागे व्हा आणि कामाला लागा, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीतर्फे करत असल्याचं आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा- वांद्रे गर्दी प्रकरणी अटक केलेल्या दुबेची पोलिस कोठडीत रवानगी 

दरम्यान, मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात परप्रांतीय मजुरांची गर्दी गोळा करत लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर भारतीय संघटनेचा अध्यक्ष विनय दुबे याला मुंबई पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याआधी देखील काही दिवसांपूर्वी योग्य सोय सुविधा मिळत नसल्याने गुजरातच्या सूरतमध्ये काही परप्रांतीय कामगारांनी रस्त्यावर उतरून जाळपोळ केली होती. तर दिल्लीत खाण्यापिण्याचे हाल होत असल्याने झुंडीच्या झुंडीने परप्रांतीय कामगार आपल्या गावी जाण्यास निघाले होते.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा