नगरसेविकेवर खुर्चीफेक

  मुंबई  -  

  कांदिवली - अभिलाखनगर येथे रविवारी झालेली एसआरएची बैठक खेचाखेची, खुर्चांची फेकाफेक, पळापळ, हाणामारीने गाजली. स्थानिक नगरसेविका गीता यादव या बैठकीला आल्या आणि वादाला तोंड फुटले. हा वाद विकोपाला गेल्यावर खुर्चांची फेकाफेक सुरू झाली. यात नगरसेविका गीता यादव यांना जबर मारहाण करण्यात आली.

  कांदिवली पश्चिमेतील अभिलाखनगर येथील हिल्डा आंटी शाळेत रविवारी एसआरएची बैठक होती. या बैठकीला रहिवाशांसह स्थानिक नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र नगरसेविका गीता यादव यांना आमंत्रण नव्हते. यावर आक्षेप घेत स्थानिकांनी गीता यादव यांना देखील कार्यक्रमाला बोलावले. मात्र गीता यादव तेथे आल्यावर उपस्थितांमध्ये बाचाबाची झाली, वातावरण एवढे तापले की सगळ्यांनी एकमेकांना खुर्च्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. गीता यादव यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. मात्र तोपर्यंत गीता यादव यांना जबर मारहाण झाली. मात्र मोबाईल दृश्यात गीता यादव यादेखील खुर्ची घेऊन मारामारी करत असल्याचे दिसत आहे.
  "ज्या ठिकाणी विकास करण्यासाठी बैठक होती ती जागा आरजीपीजीसाठी आरक्षित आहे. मात्र माझे म्हणणे त्यांना पटल नाही आणि भाजपचे स्थानिक नेते आणि पूर्व नगरसेवक कमलेश यादव यांनी आधी मला शिवीगाळ केली आणि नंतर मला मारहाण देखील केली यात बिल्डरची माणसेदेखील होती," असा आरोप नगरसेविका गीता यादव यांनी केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.