Advertisement

नगरसेवक परमेश्वर कदम यांना एसीबीने केली अटक


नगरसेवक परमेश्वर कदम यांना एसीबीने केली अटक
SHARES

मनसेतून शिवसेनेत गेलेले मुंबई महापालिकेचे नगरसेवक परमेश्वर कदम यांना बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (एसीबी) बुधवारी रात्री उशिरा अटक केली. कदम यांच्या चौकशीत एसीबीला उत्पन्नापेक्षा ६४ टक्के अधिक संपत्ती अाढळून अाली आहे. त्यामुळे एसीबीनं याप्रकरणी त्यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल केला होता.


नगरसेवक असताना केला भ्रष्टाचार

शिवसनेनं आॅक्टोबर महिन्यात मनसेचे सहा नगरसेवक फोडले होते. त्यामध्ये कदम यांचा सहभाग होता. या सर्व प्रकारामागे आर्थिक व्यवहार झाल्याचा अारोप भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. तसंच कदम हे २००७ ते २०१२ पर्यंत नगरसेवक असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून बेहिशोबी मालमत्ता गोळा केली होती, असा अारोप करण्यात अाला होता. या नगरसेवकांच्या मालमत्तेची तक्रार खासदार किरीट सोमय्या यांनी एसीबीकडे केली होती.


ज्ञात उत्पन्नापेक्षा ६४ टक्के अधिक कमाई

कदम हे वॉर्ड क्रमांक १२८मधून मनसेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मात्र एसीबीच्या चौकशीत ज्ञात उत्पन्नापेक्षा त्यांच्याजवळ ६४.१७ टक्के इतकी जास्त रक्कम गोळा केल्याचं पुढं आलं अाहे. त्यामुळेच एसीबीच्या पथकानं बुधवारी रात्री त्यांना अटक केली. दुसरीकडं मनसेनं सहाही नगरसेवकांचं पद रद्द व्हावं, अशी याचिका कोकण भवन आयुक्तांकडे केली आहे. या प्रकरणाची अद्यापही सुनावणी सुरू आहे.


हेही वाचा -

परमेश्वर कदम यांच्यापाठोपाठ अाता दिलीप लांडे रडारवर?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा