अंधेरी - निवडणूक आली की राजकारणात इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू होते. मालाडमधल्या एव्हरशाइन नगरच्या प्रभाग क्रमांक 31 चे काँग्रेस नगरसेवक परमिंदर भामरा स्वगृही परतले आहेत. चार-पाच दिवसांपूर्वी भामरा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. पण यु-टर्न घेत पुन्हा भामरा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. मंगळवारी दुपारी 3.30 वाजता अंधेरीतल्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या निवासस्थानी भामरा यांनी पक्षात प्रवेश केला. या वेळी संजय निरुपम, अस्लम शेख, निरव मजीठिया, सर्वेश जयस्वाल आदींच्या उपस्थितीत परमिंदर सिंग भामरा यांनी काँग्रेसचा झेंडा हातात घेतला. काँग्रेसमध्ये परत आणण्यासाठी अस्लम शेख, निरव मजीठिया हे चार दिवस सतत भामरा यांच्याशी संपर्कात होते.