बिनीता वोराचे आणखी एक अनधिकृत बांधकाम उघड

  Andheri
  बिनीता वोराचे आणखी एक अनधिकृत बांधकाम उघड
  मुंबई  -  

  मुंबई - काँग्रेस नगरसेविकास बिनीता वोरा आणि त्यांच्या पतीनं विर्लेपार्लेतील त्यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याचं उघड झालंय. याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झालीय. हे अनधिकृत बांधकाम पालिकेनं वैध केल्याने पालिकाही अडचणीत आली आहे. याप्रकरणी महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांना न्यायालयात माफी मागावी लागली. तर हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश असताना वोरा यांनी पंधरा दिवसांपूर्वी नव्याने अऩधिकृत शोरूम उभारल्याचा आरोप याचिकाकर्ते जितेंद्र जनावळे यांनी केलाय. पालिका वोरा यांना इतकं अभय का देतेय असा प्रश्न विचारत नव्यानं झालेल्या या अनधिकृत बांधकामाबाबत पालिका आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचं जनावळे यांनी सांगितलं.

  मुंबई लाइव्हने वोरा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळलेत. टीडीआर, फंजिबल एफएसआय आणि एफएसआयच्या रुपात आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर एफएसआय शिल्लक आहे. त्यामुळे बंगल्यात केलेलं काम अनधिकृत कसे असा सवाल वोरा यांनी केलाय. तर राजकीय वैमनस्यातून जनावळे आरोप करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.