Advertisement

“कल करे सो आज कर”, कार्यालयीन वेळेबाबत पंतप्रधानांकडे उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी

कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून केंद्राने नवीन राष्ट्रीय धोरण आखावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

“कल करे सो आज कर”, कार्यालयीन वेळेबाबत पंतप्रधानांकडे उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी
SHARES

“कल करे सो आज कर, आज करे सो अभी” अशी राज्य शासनाची भूमिका असून कोरोना संकटाच्या काळातही राज्य शासनाने विकास थांबविला नाही तर आलेल्या संकटावर मात करीत आम्ही मार्ग काढत होतो. कोरोना विरोधातील लढा अजूनही संपलेला नाही. नवे बदल आपण स्वीकारत आहोत. त्यामुळे कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून केंद्राने नवीन राष्ट्रीय धोरण आखावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची सहावी बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.  

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, कोविडचा (covid19)लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणं गरजेचं आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावं.

हेही वाचा- दादांच्या मनातलं ओळखणारी भाषा शिकायचीय- उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री पुढं म्हणाले की, आम्ही आपत्तीला संधीमध्ये बदलत आहोत. गेल्या वर्षभरात आपण माहिती तंत्रज्ञानावर भरपूर भर दिला असून इंटरनेट सुविधा सर्व गावांमध्ये पोहोचवणं आमचं उद्दिष्ट्य आहे. भारतनेटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा जाळं पसरविणं सुरु असलं तरी अजून दुर्गम भागातील २५०० पेक्षा जास्त गावं व खेड्यांमध्ये इंटरनेट व मोबाईल कनेक्टिव्हीटी पोहोचलेली नाही. 

केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून ही सुविधा राज्याला लवकरात लवकर कशी मिळेल ते पाहावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले. गावोगावच्या नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व सेवांचा जलद, चांगला लाभ मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत असंही ते म्हणाले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा व्हावी म्हणून राज्य शासन प्रयत्न करीत असून केंद्राने अशा प्रकल्पांना प्राधान्याने साहाय्य करावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

(create a new policy for office timing maharashtra cm uddhav thackeray to pm narendra modi)

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा