'डॅडी'साठी गीता गवळी 'वर्षा'दारी


SHARE

मुंबई - महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या हालचाली आता तीव्र होऊ लागल्या आहेत. शिवसेना मॅजिक फिगर गाठण्यासाठी प्रयत्नशील आहे. अखिल भारतीय सेनेेच्या नगरसेविका गीता गवळी यांना शिवसेनेकडे वळविण्याचे प्रयत्न धूसर झाले आहेत. शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे यांनी गीता गवळी यांना शिवसेना भवनवर चर्चेसाठी बोलावले होते. गीता गवळींनी पहिल्या वर्षी आरोग्य समिती अध्यक्षपद आणि पाच वर्ष स्थायी समिती सदस्य पदाची मागणी केल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार गीता गवळीला या सर्वांपेक्षा जास्त 'डॅडी' अरुण गवळीला जेलमधून बाहेर काढणे महत्वाचे आहे. मुंबई महापालिकेत घोडेबाजार सुरू झालाय. त्यामुळे अपक्ष आणि गीता गवळींचा भाव वधारला आहे. या अगोदर शिवसेनेला पाठींबा देणारा अभासे पक्ष आता भाजपाला साथ देण्याची जास्त शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालय आहे. भाजपाला महापालिकेत समर्थन करण्यासाठी डॅडीच्या सुटकेचे आश्वासन दाखविले जावू शकते. तसंच गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर गीता गवळी यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे अशीही सूत्रांनी माहिती दिली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या