Advertisement

आयुष्य वाकण्यात गेलं, तुम्ही ठाकरे नाही 'वाकडे' आडनाव लावा : ज्योती वाघमारे

दसऱ्यानिमित्त (Dasara Melava 2023) आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली.

आयुष्य वाकण्यात गेलं, तुम्ही ठाकरे नाही 'वाकडे' आडनाव लावा : ज्योती वाघमारे
SHARES

शिवसेना शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी दसऱ्यानिमित्त (Dasara Melava 2023) आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली. 

आम्हाला मिंधे म्हणता, तुम्ही अडीच वर्षे काय धंदे केले ते सांगा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर वाकण्यात आयुष्य गेलं, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ठाकरे नव्हे तर वाकडे आडनाव लावावं अशी जहरी टीका शिवसेना शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी केली. 

ज्योती वाघमारे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाल्या की, तिकडे जमले आहेत सत्तेसाठी इमान विकलेले कावळे आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. आज 57 वर्षांची परंपरा असणाऱ्या या दसरा मेळाव्याच्या मंचावरून मी प्रश्न विचारते की मर्द कुणाला म्हणायचं? कोरोना काळात घरात बसणारा की पीपीई किट घालून रुग्णांची भेट घेणारा? अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात जाणारा मर्द नसतो, रात्री तीन वाजेपर्यंत काम करणारा मर्द असतो. पेंग्विन आणणारा मर्द नाही तर अफजलखानाची वाघनखं आणणारा मर्द असतो. 



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा