Advertisement

खासगी डाॅक्टरांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला, म्हणाले…

राज्यात कोरोनाचं संकट हाताबाहेर जात असताना या विषाणूशी लढणाऱ्या डाॅक्टरांच्या प्रश्नाकडे राज्य सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याचं डाॅक्टरांनी राज ठाकरेंशी बोलताना सांगितलं.

खासगी डाॅक्टरांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला, म्हणाले…
SHARES

राज्यातील खासगी डाॅक्टरांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत खासगी डाॅक्टरांनी आपल्या व्यथा त्यांच्यापुढे मांडल्या. राज्यात कोरोनाचं संकट हाताबाहेर जात असताना या विषाणूशी लढणाऱ्या डाॅक्टरांच्या प्रश्नाकडे राज्य सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याचं डाॅक्टरांनी राज ठाकरेंशी बोलताना सांगितलं. (delegation of private doctors meet mns chief raj thackeray in mumbai)

कोरोना संकटाच्या काळात खासगी डाॅक्टरांनी आपापले क्लिनिक उघडून रूग्णांवर उपचार करावेत, अशी अपेक्षा राज्य सरकारकडून करण्यात येते. त्यानुसार बहुतेक भागात डाॅक्टरांनी क्लिनिक उघडून रुग्णांना सेवा देण्यास सुरूवात देखील केली आहे. परंतु सरकारकडून डाॅक्टरांना पीपीई किट देखील मुबलक प्रमाणात पुरवण्यात येत नाही. दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये क्लिनिक चालवणारे डाॅक्टर जीव मुठीत घेऊन कोरोना योद्ध्यांप्रमाणे रुग्णांवर उपचार करत आहेत. परंतु त्यांना साधा विम्याचा लाभही मिळत नाही. अशा स्थितीत कोरोनामुळे बळी पडणाऱ्या डाॅक्टरांच्या कुटुंबियांची जबाबदारी कोण उचलणार असा प्रश्न या शिष्टमंडळाने उपस्थित केला.

हेही वाचा - नेत्यांनी थोडा संयम ठेवावा, राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

आमच्या एका सहकाऱ्याचा जून महिन्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. ते लॉकडाऊनच्या काळात क्लिनिक उघडं ठेवून रूग्णांवर उपचार करत होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने आम्ही सरकारकडे विम्याचा दावा मिळण्यासाठी अर्ज केला. परंतु तुमचा डॉक्टर प्रायव्हेड प्रॅक्टिशनर असल्याने विमा देता येणार नाही, असं उत्तर आम्हाला देण्यात आलं. तुम्ही स्वत:च्या खासगी दवाखान्यात काम करत होता आणि याचा कोव्हिडशी काही संबंध नाही असं नाकारलेल्या अर्जात नमूद करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या या अतिशय असंवेदनशील आणि निषेधार्ह भूमिकेबद्दल राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात आल्याचं शिष्टमंडळामध्ये उपस्थित एका डाॅक्टरने सांगितलं. 

यातून लवकरच मार्ग काढून खासगी डाॅक्टरांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असं आश्वासन या डाॅक्टरांना देण्यात आलं.

हेही वाचा - नेत्यांनी थोडा संयम ठेवावा, राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा