Advertisement

नेत्यांनी थोडा संयम ठेवावा, राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

सगळं काही बंद राहावं अशी मुख्यमंत्र्यांची बिलकूल इच्छा नाही. मुख्यमंत्री त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहेत, असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

नेत्यांनी थोडा संयम ठेवावा, राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
SHARES

सगळं काही बंद राहावं अशी मुख्यमंत्र्यांची बिलकूल इच्छा नाही. मुख्यमंत्री त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहेत, असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? असा प्रश्न विचारणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. (shiv sena mp sanjay raut replies mns chief raj thackeray over temple opening issue in maharashtra)

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राज्यातील जनतेचं आरोग्य आणि त्यांचं हित लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाॅकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सगळं काही बंद करण्याची मुख्यमंत्र्यांना मुळीच हौस नाही. उलट मंदिर सुरू करण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे. त्याबाबत ते लवकरच निर्णय घेऊ शकतात. परंतु त्यासाठी थोडा संयम ठेवावा लागेल, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल. केंद्र सरकारप्रमाणे कोरोना ही देवाची करणी आहे, असं मानायला राज्य सरकार तयार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपलाही टोला हाणला.

देशासह राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पाहिजे. लोकशाहीत सर्वच विरोधकांना मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचा अधिकार आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा - सरकारला मंदिर उघडण्याबाबत इतका आकस का?- राज ठाकरे

पंढरपूर इथं विठ्ठल मंदिर सुरू करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. त्यामुळे कोरोनाच संसर्ग आणखी पसरू शकतो. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी मशिद सुरू करण्यासाठी औरंगाबादमध्ये आंदोलन करताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि शिवसैनिक खडकेश्वर मंदिर परिसरात गेल्यानंतर जलिल यांना आंदोलन मागे घ्यावे लागलं. आपल्या शहराची काय परिस्थिती आहे हे जर निवडून आलेल्या खासदारांना कळत नसेल तर दुर्देव आहे. नेत्यांनी संयम पाळला पाहिजे. परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'अनलॉक' क्रमांक अमुक तमुक अशा 'अनलॉक' प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरु आहेत, मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे. या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का? सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा, अन्यथा नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, असा इशारा दिला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा