धोकादायक पर्यटन स्थळांवर नागरिकांना सावध करण्यासाठी माहिती देणारे फलक लावण्याचे निर्देशही अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. लोणावळ्यातील (Lonavala) भुशी धरणात 30 जून रोजी एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला होता.
विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भुशी धरणात घडलेल्या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. अशा धोकादायक पर्यटन स्थळांवर नागरिकांना सावध करण्यासाठी माहिती देणारे फलक लावण्याचे निर्देशही अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले. लोणावळ्यातील भुशी धरणात (Bhushi dam) 30 जून रोजी एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला होता.
लोणावळा येथील भुशी धरणाच्या घटनेच्या निमित्ताने पर्यटकांच्या सुरक्षेवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गेल्या दोन दिवसांपासून विधानसभेत प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. आमदार चेतन तुपे (chetan tupe) यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला, त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि अशा ठिकाणी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती.
आमदार चेतन तुपे यांना उत्तर देताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत भुशी धरणाची घटना दुर्दैवी असल्याची माहिती दिली. "एकाच कुटुंबातील पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि लोकांना अशा ठिकाणी जाण्यापासून रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत." असे अजित पवार म्हणाले.
"तसेच महाराष्ट्रातील अशा ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. माहितीपूर्ण फलक उभारणे, कुंपण घालणे, सुरक्षा जाळ्या बसवणे ही कामे केली जातील. गर्दीच्या पर्यटन स्थळांवर सध्या सुरक्षेच्या उपाययोजना आहेत. तसेच अति दुर्गम असलेल्या धोकादायक ठिकाणीही व्यवस्था केली जाईल.” असे अजित पवार पुढे म्हणाले.
तत्पुर्वी सोमवारीही प्रदेश काँग्रेस नाना पटोले (nana patole) यांनी राज्य सरकारला विचारले होते की, महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांवर सरकारने सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना केल्या आहेत? नाना पटोले (nana patole) यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. राज्यातील ही पहिलीच घटना नाही, पावसाळ्यात अशा घटना अनेकदा घडतात.
नाना पटोले (nana patole) म्हणाले होते, "पर्यटकांच्या सुरक्षेकडे सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे राज्यात वारंवार अशा घटना घडतात. आम्ही सुरक्षा देऊ, पर्यटनस्थळांवर सुरक्षा व्यवस्था करू, अशी उडवाउडवीची उत्तरे सरकार देत आहे, त्यामुळे सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी."
हेही वाचा