पराभव लागला जिव्हारी

 Dadar
पराभव लागला जिव्हारी

दादर - महापालिका निवडणुकीचा पराभव वॉर्ड क्रमांक 191 चे नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या खूपच जिव्हारी लागल्याचे चित्र दादर मध्ये पाहायला मिळत आहे. सध्या संदीप देशपांडे चर्चेत आले आहेत ते म्हणजे दादरमधील सेल्फी पॉईंट बंद करण्याविषयी घेतलेल्या निर्णयामुळे. 2017 च्या निवडणुकीत नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडेंच्या झालेल्या पराभवामुळे शिवाजी पार्कचा सेल्फी पॉईंट बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

सध्या निवडणूकीच्या दरम्यान 14 फेब्रुवारीला व्हॅलेंण्टाइन डे चं आकर्षण ठरलेला दादरवर प्रेम करा हा संदेश देणारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. 1 मार्चला हा सेल्फी पॉईंट काढून पुन्हा सेल्फी पॉईंट बनवणार नाही असंही या वेळी देशपांडे यांनी सांगितलं.

सीएसआरमधून देखभालीसाठी निधी उपलब्ध होणे कठिण असल्याचं कारण त्यासाठी देण्यात आलं आहे. सेल्फी पॉईंट तयार केला तर तो मेंटेन कोण करणार हा प्रश्न सध्या देशपांडे यांच्यासमोर असल्यामुळे मनसेकडून शिवाजी पार्कमध्ये सेल्फी पॉईंट तयार केला जाणार नसल्याचंही सांगितलं.

Loading Comments