'एकही विट रचू देणार नाही'

 BDD Chawl
'एकही विट रचू देणार नाही'
'एकही विट रचू देणार नाही'
See all

वरळी - प्रस्तावित असलेल्या मेट्रो रेल्वेच्या ३ टप्यातील प्रकल्पामुळे वरळीतील ई. मोझेस मार्गवरील काही घरे व चाळी विस्थापित होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना बोलावून याचा जाब विचारला. वर्षानुवर्षे येथे राहणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबीयांच्या घरावर वरवंटा फिरवून होत असलेल्या विकासास शिवसेनेचा विरोध असेल. यासाठी मेट्रो प्रशासनाने या मार्गात थोडा बदल करून या चाळी व घरे विस्थापित होण्यापासून वाचवावीत किंवा पर्यायी मार्ग तयार करावा. मेट्रो प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या घरांच्या पुनर्वसनाची जबाबदारी महानगरपालिका आणि एमएमआरडीएची असून त्यांच्या पुनर्वसनाबाबत योग्य त्या स्वरूपातील तरतुद करून लेखी हमी दिल्या शिवाय या प्रकल्पाची एकही विट रचू देणार नाही, असा इशारा सुनील शिंदे यांनी यावेळी दिला.

Loading Comments