'विठ्ठल मंदिर' नामकरणासाठी 1 मार्चपासून उपोषण

 Dadar
'विठ्ठल मंदिर' नामकरणासाठी 1 मार्चपासून उपोषण

‌मुंबई - चेंबूर ते जेकब सर्कल मोनो मार्गातील दादर पूर्व मोनो स्थानकाचे नाव विठ्ठल मंदिर करण्याची मागणी एमएमआरडीएने फेटाळली आहे. त्यामुळे आता नामकरणाची मागणी करणाऱ्या विठ्ठल भक्तांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि म्हणूनच आता विठ्ठलाचाच धावा करण्याचा निर्णय या विठ्ठल भक्तांनी घेतला आहे. 1 मार्चपासून नागरी दक्षता समिती आणि वडाळ्यातील विठ्ठल भक्त बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. जो पर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची माहिती समितीचे सदस्य दीपक शिंदे यांनी दिली. 1 मार्चला सकाळी 9 वाजता विठ्ठल मंदिरात उपोषणाला सुरुवात होणार आहे. या उपोषणाची दखल एमएमआरडीए घेते का हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Loading Comments