घाटला गावात शिवसेनेत वाद भडकणार?

  Chembur
  घाटला गावात शिवसेनेत वाद भडकणार?
  मुंबई  -  

  चेंबूर - घाटला गाव येथील प्रभाग क्रमांक 147 ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे. येथील शिवसेना नगरसेवक अनिल पाटणकर आपल्या पत्नीला निवडणुकीसाठी उभे करण्यास इच्छुक आहेत, तर आमदार तुकाराम काते यांच्या पत्नीनेही येथून निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी केल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेनेत वाद भडकण्याची चिन्हे आहेत.

  चेंबूरमधील घाटला गावात शिवसेनेचे वर्चस्व आहे. 2012 पूर्वी सलग 20 वर्षे येथून शिवसेनेचा नगरसेवक निवडून येत होता. पण 2012 साली येथून काँग्रेसचे अनिल पाटणकर निवडून आले. मात्र २०१५ मध्ये पाटणकर यांनी काँग्रेसला राजीनामा देत सेनेत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा पाटणकर निवडूण आले.
  मात्र सध्या ते नगरसेवक असलेला १४७ हा प्रभाग नव्या आरक्षणानुसार महिला ओबीसींसाठी अरक्षित झाला आहे. त्यामुळे ते त्यांच्या पत्नीला याठिकाणी उभे करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच सध्या अणुशक्तीचे आमदार तुकाराम काते यांच्या पत्नी देखील या वार्डात १० वर्षे नगरसेविका होत्या. त्यामुळे त्यांनीही पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. आमदार काते आणि पाटणकर दोघांचे सेनेत चांगले वजन आहे. त्यामुळे तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.