Advertisement

Disha Salian death case: आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल - नितेश राणे

नितेश राणे यांनी देखील आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

Disha Salian death case: आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल - नितेश राणे
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh Rajput) आणि दिशा सालियान (Disha Salian) मृत्यूप्रकरणावरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राहुल शेवाळे यांनी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर आता नितेश राणे यांनी देखील आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, “याप्रकरात फक्त आदित्य ठाकरे यांचेच नाव का समोर येत आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. इतरांचे नावांची चर्चा का होत नाही हे समजण्याची गरज असल्याचे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले. तसेच जशी श्रद्धा प्रकरणी आफताबची नार्कोटेस्ट होते तशी आदित्य ठाकरे यांची एकदा नार्कोटेस्ट करा, पूर्ण सत्य बाहेर येईल.”

रिया चक्रवर्तीला AU नावाच्या व्यक्तीने 44 फोन का केले होते याचाही सत्य बाहेर येण्याची गरज असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

पुढे नितेश राणे म्हणाले, आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे खासदार राहुल शेवाळे हे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये होते. जेव्हा ते पक्षाला पेट्या पाठवत होते. तेव्हा त्यांची किंमत होती. मात्र आता त्यांनी सत्याची बाजू घेतली असल्याने त्यांची किंमत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच आजही दिशा सालियान यांच्या मृत्यूचे प्रकरण मुंबई पोलिसांकडेच आहे. सीबीआयकडे अद्याप वर्ग झाले नाही. या निमित्ताने आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हे प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करण्याची विनंती करणार आहे.

8 जून रोजी काय झाले, दोनवेळा तपास अधिकारी का बदलण्यात आले. या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज का गायब झाले. तसेच फ्लॅटच्या विजिटर्स बुकमधील पाने कोणी फाडली. दिशाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट बाहेर का आला नाही. या प्रश्नांची उत्तरे समोर येणे गरजेचे असल्याचेही यावेळी नितेश राणे म्हणाले.



हेही वाचा

आदित्य ठाकरेंच्या नावाने रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 कॉल, राहुल शेवाळेंचा आरोप

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा