• 'राग दाबून ठेऊ नका, व्यक्त करा'
  • 'राग दाबून ठेऊ नका, व्यक्त करा'
  • 'राग दाबून ठेऊ नका, व्यक्त करा'
SHARE

वडाळा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी एक हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्या. तेव्हापासून सर्वसामान्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय. स्वतःचे पैसे खात्यातून काढण्यासही त्रास होतोय. या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे आलेला राग व्यक्त करा, असं आवाहन करत 15 डिसेंबर रोजी वडाळा-शिवडी रेल्वे स्थानकाबाहेर नायगाव-वडाळा काँग्रेसच्या वतीनं स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं. या अभियानात सहभाग घेताना अनेकांनी फलकावर स्वाक्षरी करून राग व्यक्त केला. या वेळी नगरसेवक सुनील मोरे, नगरसेविका पल्लवी मुणगेकर, रामबच्चन मुराई, ब्लॉक अध्यक्ष महेंद्र मुणगेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या