Advertisement

मोर्चावरील लाठीमाराच्या चौकशीचे आदेश


मोर्चावरील लाठीमाराच्या चौकशीचे आदेश
SHARES

मुंबई -शिक्षकांच्या मोर्चात झालेल्या लाठीमाराचा तपास करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले.तसेच शिक्षकांची चूक नसताना त्यांच्यावर लाठीमार झाला असेल तर तो चुकीचा आहे, असेही त्यांनी सांगितले. शासन निर्णयावर ज्या शिक्षक संघटनांचा आक्षेप आहे, त्या संघटनांशी चर्चा सुरु केली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांचे नुकसान होईल अशी कृती कोणीही करु नये, असे आवाहनही तावडे यांनी केले.इयत्ता 9 आणि 10 वी मधील निकालाची टक्केवारी सुधारण्यासाठी 100 टक्के अट ठेवण्यात आली आहे. शाळांची आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी यासाठी हे प्रयत्न करण्यात आले आहेत. सामान्य जनतेचा पैसा खोट्या शिक्षण संस्थाचालकांनी लाटू नये यासाठी काही निकष कडक करण्यात आले आहेत. परंतु केवळ या निकालाच्या निकषांवर अनुदान अडविण्यात येणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिक्षकांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ काही शिक्षक संघटनांनी राज्यभरात शिक्षक संपाची हाक दिली आहे. मुंबईतही या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पण विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी या संपामध्ये सहभागी न होण्याचे आवाहनही यावेळी तावडे यांनी केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा