बाईक रॅलीतून बाबासाहेबांना अभिवादन

दादर - मंगळवारी ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीने बाईक रॅली काढली होती. वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेजपासून काढण्यात आलेली ही रॅली सेनाभवनपर्यंत होती. रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे रॅलीत असलेला चित्र रथ. यामध्ये भव्य अशी बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांची मूर्ती. यामध्ये तरुण तरुणींचा सहभाग प्रामुख्याने दिसून आला.

Loading Comments