Advertisement

बीफ खा, किस करा! पण त्याचा उत्सव कशाला?- नायडू

जसं बीफ फेस्टिव्हल तसंच किस फेस्टिव्हल. तुम्हाला कुणाला किस करायचं, तर त्यासाठी फेस्टिव्हल कशाला लागतं? त्यासाठी कुणाची परवानगी कशासाठी घ्यावी लागते?' असा सवालही उपराष्‍ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उपस्थित केला.

बीफ खा, किस करा! पण त्याचा उत्सव कशाला?- नायडू
SHARES

'तुम्हाला बीफ खायचं आहे ना? मग जरूर खा. पण त्याच्यासाठी फेस्टिव्हल कशाला? राजकारण कशाला? जसं बीफ फेस्टिव्हल तसंच किस फेस्टिव्हल. तुम्हाला कुणाला किस करायचं, तर त्यासाठी फेस्टिव्हल कशाला लागतं? त्यासाठी कुणाची परवानगी कशासाठी घ्यावी लागते?' असा सवालही उपराष्‍ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उपस्थित केला. ते मुंबईतील आर.ए.पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्सच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते.


प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा प्रश्न

'मी स्वत: मांसाहारी आहे. कुणी काय खावं आणि काय खाऊ नये, हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. परंतु काही लोक विनाकारण प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देतात आणि बेताल वक्तव्य करतात, असं मत त्यांनी मांडलं.

काही लोक स्वातंत्र्याच्या नावावर अफजल गुरूचं कौतुक करतात. मात्र त्यानेच देशाची संसद उडवून देण्याचा कट रचला होता हे विसरता काम नये, असं सांगत त्यांनी मनातील उद्विग्नता व्यक्त केली.


राजकीय रंग देण्याचं प्रयत्न

कत्तलीसाठी जनावरांच्या खरेदी-विक्रीवर गेल्यावर्षी केंद्र सरकारने बंदी घातली होती. त्यानंतर विरोधकांकडून भाजपावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. अनेक राज्यांतील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी बीफ पार्टी आयोजित करून या निर्णयाचा निषेध केला होता. त्यावेळी नायडू यांनी विरोधकांवर बीफ बंदीचं राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. यावर काही लोक प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देण्यासाठी काहीही बोलत सुटले आहेत, असं नायडूंनी म्हटलं.

हिंदू धर्म सगळ्या प्रकारच्या संस्कृती आणि मान्यतांचा समावेश करून घेतो. प्रत्येक भारतीयांमध्ये धर्मनिरपेक्षतेचा गुण आहे म्हणून भारत सुरक्षित आहे. यासाठी कुठलाही पक्ष किंवा संविधान विशेष कार्यरत नाही, असं मत त्यांनी मांडलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा